About us

‘महाराष्ट्र बालशिक्षण परिषद’ म्हणजे बालशिक्षणासाठी उभारलेले आंदोलन आहे. बालशिक्षण सार्वत्रिक व्हावे, बाल शिक्षणाच्या पद्धतीत अमुलाग्र बदल होऊन ते निखळ शास्त्रीय व्हावे,पायाभूत शिक्षण म्हणून त्यास मान्यता मिळावी. पालकांचे आणि समाजाचे बालकांच्या संदर्भात असलेले वर्तन बालकांच्या विकासास पूरक व्हावे, बालशिक्षणा बाबत पालक आणि समाजाची मानसिकता बदलावी, शासनाने योग्य ती धोरणे बाल शिक्षणा बाबत आखावीत, या उद्देशाना समोर ठेवून महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेची स्थापना झाली आणि नव्या आंदोलनाला सुरुवात झाली. अभ्यास करणे, संशोधन करणे,कार्य शाळा घेणे, चर्चा परिसंवाद घडवणे, लेख व पुस्तिका लिहिणे अत्यंत शैक्षणिक मार्ग या आंदोलना साठी अवलंबिला गेला आहे